Posts

Showing posts from July, 2026

नवी शाळा, नवी उमेद: कुंभवडे नं. १ शाळेत नव्या पर्वाची सुरुवात!

नवी शाळा, नवी उमेद: कुंभवडे नं. १ शाळेत नव्या पर्वाची सुरुवात!           ​बऱ्याचदा जुन्या, साचेबद्ध वातावरणातून बाहेर पडून काहीतरी नवा बदल स्वीकारला, की मनात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा आणि नवी उभारी निर्माण होते. माझ्याबाबतीतही काल अगदी असंच घडलं. ​          काल, शुक्रवार दिनांक १० जुलै २०२६ रोजी, दुपारच्या सत्रात मी 'जिल्हा परिषद शाळा कुंभवडे नं. १' येथे समायोजनाने मुख्याध्यापक ( उपशिक्षक ) म्हणून हजर झालो. मी जेव्हा शाळेत पोहोचलो, तेव्हा तिथे तात्पुरत्या कामगिरीवर कार्यरत असलेले स्नेही शिक्षक श्री. गिरीश कदम सर उपस्थित होते. त्यांनी अतिशय आदरपूर्वक आणि आपुलकीने माझं स्वागत करत मला शाळेत हजर करून घेतलं. या शाळेचे आधीचे शिक्षक श्री. किरण सावंत सर यांची केंद्रप्रमुख पदी पदोन्नती झाल्यामुळे, मधल्या काळात शेजारच्या शाळेतील शिक्षक येथे अतिरिक्त जबाबदारी सांभाळत होते. स्वतःची शाळा सांभाळून या शाळेलाही वेळ देणाऱ्या त्या सर्व शिक्षकांचे आभार मानावे तितके थोडेच आहेत, त्यांचे मनापासून कौतुक!           ​माझा या नवीन शाळे...